महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा सलग्न, आर्य समाज, परभणी. तसेच ज्ञानगंगा गुरुकुल, पिंगळी रोड, परभणी. यांच्या संयुक्त विद्यमाने शहरा जवळ असलेल्या ज्ञानगंगा गुरुकुल, पिंगळी रोड, परभणी येथे भव्य सहा दिवसीय आर्य वीर दल शिबिर संपन्न झाले. ज्या मधे वय वर्ष १६ ते २० वयोगटातील तरुण तरुणींच्या मधून आत्मरक्षा, चरित्रनिर्माण, आहार विहार, आसन प्राणायाम, जुडो कराटे, आदर्श मानवीय मूल्यांचे जतन आदी।

बरोबरच प्रखर राष्ट्रभक्त धर्माभिमानी पिढीचे निर्माण व्हावे या साठी सहा दिवसीय बौद्धिक, शारीरिक मार्गदर्शन घेण्यात आले. या वेळी महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभे कडून वैदिक गर्जना चे संपादक प्रा.डॉ आचार्य नयनकुमार, आयुर्वेदाचार्य श्री विज्ञान मुनीजी,भजनोपदेशक प्रतापसिंह चव्हाण,आर्य वीर दल प्रशिक्षक नितेश आर्य ( मेरठ, उत्तर प्रदेश ) आदींचे मार्गदर्शन लाभले।


आर्य समाज,परभणी चे उपमंत्री श्री बाबुराव आर्य, आर्य वीर दल परभणी जिल्हाध्यक्ष श्री दिगंबर देवकते, आर्य वीर दल परभणी सचिव दयानंद आर्य, आर्य वीर दल सह-सचिव रोहित जगदाळे आदींनी ही सहा दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप के.पी कनके यांनी केले तर आभार प्रदर्शन दयानंद आर्य यांनी केले।
इन खबरों को भी पढ़ें।
सार्वदेशिक आर्य वीर दल दिल्ली क्षेत्र के 6 शाखाओं के सामूहिक वृहद निरीक्षण का कार्यक्रम